मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही महिलांच्या आर्थिक स्थैर्यासाठी एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात नियमितपणे निधी जमा केला जातो. परंतु, काही महिलांच्या खात्यात हा निधी येत नाही, ज्याचे प्रमुख कारण म्हणजे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक न केलेले असणे. यामुळे, या योजनेचा पुढील हप्ता मिळवण्यासाठी आधार कार्ड बँकेशी लिंक करणे अत्यंत आवश्यक आहे. खालील मार्गदर्शनानुसार, आपण घरबसल्या आपल्या आधार कार्डला बँक खात्याशी कसे लिंक करू शकता ते जाणून घेऊया
आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे की नाही, कसे ओळखावे?
1. गुगलवर सर्च करा:
सर्वप्रथम, गुगलवर जाऊन “my aadhar” असे सर्च करा. या सर्चमुळे आपण ‘माय आधार’च्या वेबसाइटवर पोहोचाल.
2. लॉगिन प्रक्रिया:
वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर, आधार कार्ड क्रमांक आणि कॅप्चा टाकून लॉगिन करा. यानंतर, ‘लॉग इन विथ ओटीपी’ या पर्यायावर क्लिक करा. आपल्या मोबाईलवर आलेला ओटीपी टाकून लॉगिन करा.
3. बँक सीडिंग स्टेटस तपासा:
लॉगिन केल्यानंतर, होम स्क्रीनवरून खाली स्क्रोल करा आणि ‘Bank seeding status’ हा पर्याय शोधा. त्यावर क्लिक करून, आपला आधार कार्ड क्रमांक, बँकेचे नाव, आणि Bank seeding status हे ॲक्टिव्ह आहे की नाही ते तपासा. जर आधार कार्ड लिंक नसेल तर हे स्टेटस ‘inactive’ असे दिसेल.
आधार कार्ड बँक अकाऊंटशी लिंक करण्याची प्रक्रिया
1. अधिकृत NPCI वेबसाईटला भेट द्या:
आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करण्यासाठी सर्वप्रथम गुगलवर “NPCI (National Payment Corporation of India)” असे सर्च करा. सर्च केल्यानंतर, npci.org.in या अधिकृत वेबसाइटवर क्लिक करा.
2. Bharat Aadhar Seeding प्रक्रिया:
वेबसाईटच्या होमस्क्रीनवरून खाली स्क्रोल करा आणि ‘consumer’ हा पर्याय निवडा. येथे ‘Bharat Aadhar Seeding’ हा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा आणि ‘enable’ वर क्लिक करून पुढील पेज ओपन करा.
3. आधार कार्ड नंबर टाका:
नवीन पेजवर आपला आधार कार्ड नंबर टाका. नंतर, ‘request for Aadhar seeding’ या पर्यायावर क्लिक करा.
4. बँकेचे नाव निवडा:
आपल्या बँकेचे अकाऊंट लिकं करण्यासाठी, त्या बँकेचे नाव निवडा आणि ‘fresh seeding’ या पर्यायावर क्लिक करा. यानंतर, बँकेचा अकाऊंट नंबर टाका आणि कन्फर्म करा.
5. टर्म्स आणि कंडीशन्स स्वीकारा:
अकाऊंट नंबर कन्फर्म केल्यावर, खाली दिलेल्या टर्म्स आणि कंडीशन्स वाचा आणि स्वीकारा. यानंतर, कॅप्चा टाकून ‘proceed’ बटणावर क्लिक करा. पुढे ‘Agree and Continue’ या पर्यायावर क्लिक करा.
6. ओटीपीद्वारे प्रक्रिया पूर्ण करा:
यानंतर, आपल्या मोबाईलवर आलेला ओटीपी टाका. यामुळे, आपल्या आधार कार्डचे बँक अकाऊंटसोबत लिंकिंग पूर्ण होईल.
या प्रक्रियेमुळे महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता मिळण्यास मदत होईल. त्यामुळे, लवकरात लवकर आपल्या आधार कार्डला बँक खात्याशी लिंक करा आणि योजनेचे लाभ मिळवा.