या महिन्यात तब्बल 15 दिवस बँका राहणार बंद, पहा संपूर्ण यादी! September 1, 2024 by admin Bank Holidays : सप्टेंबर महिन्यातील बँकेला एकूण 15 दिवस सुट्ट्या असणार आहेत. रिझर्व्ह बँकेने सुट्ट्यांची ही यादी जारी केली आहे. त्यामुळे या सुट्ट्या लक्षात घेऊनच तुम्ही तुमचे नियोजन आखायला हवे. सप्टेंबर महिना चालू झाला आहे. आजपासून म्हणजेच 1 सप्टेंबरपासून देशभरात अनेक नियमांत बदल होणार आहेत. बँकिंग क्षेत्रातही काही बदल झाले आहेत. या सप्टेंबर महिन्यात बँकांना तब्बल 15 दिवस सुट्ट्या आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या सुट्ट्यांच्या यादीप्रमाणे सप्टेंबर महिन्यात शनिवार, रविवार मिळून एकूण 15 दिवस बँका बंद (Bank Holidays in September 2024) असतील. सप्टेंबर महिन्यात तुम्हाला बँकांशी संबंधित काही काम करायचे असेल तर या सुट्ट्या लक्षात घेऊनच तुम्ही तुमचे नियोजन करायला हवे. दरम्यान, सप्टेंबर महिन्यात एकूण 15 दिवस बँका बंद असल्या तरी बँक ज्या दिवशी बंद असेल त्या दिवशी ऑनलाईन बँकिंगची सेवा चालूच राहील. म्हणजेच तुम्ही ऑनलाईन व्यवहाराच्या माध्यमातून पैशांचे व्यवहार करू शकता. बँकेच्या सुट्टीच्या दिवशी तुम्हाला फक्त बँकेत प्रत्यक्ष जाऊन काम करता येणार नाही. बँकेच्या या सुट्ट्या लक्षात घेऊनच तुम्ही बँकेसंदर्भातील कामाचे नियोजन आखावे.